PHOTO: ओढ्याला पूर, रस्ते बंद अन् 'तिला' सुरू झाल्या प्रसूती कळा; नाईलाजास्तव पूर आलेल्या ओढ्यातून वाट काढत गावकऱ्यांनी खाटेवरून महिलेला रुग्णालयात नेलं

पुरामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. त्यामुळे रस्ते वाहतूक बंद झाली आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अशातच मुसळधार पावसाचा फटका हिंगोली जिल्ह्यालाही बसला आहे. हिंगोलीतील चोंढी बहिरोबा येथे धक्कादायक प्रकार घडला आहे.

पुराच्या पाण्यातून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी न्यायची वेळ हिंगोलीच्या चोंडी भैरोबा गावातील नागरिकांवर आली होती.
मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे गावाजवळ असलेल्या ओढ्याला पूर आला आणि रस्त्यांवरही पाणी आल्यानं रस्ते वाहतूकही बंद झाली.
गावातील गरोदर असलेल्या स्वाती किरवले यांना प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांना तातडीनं बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल करावं लागणार होतं. पण, मुसळधार पाऊस आणि दुथडी भरुन वाहणारा ओढा यातून वाट कशी काढायची, हा गावकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न होता.
ओढ्याला भरपूर पाणी होतं, ते पाणी रस्त्यांवरुन वाहत असल्यामुळे वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे गावकऱ्यांनी नाईलाजानं मोठा निर्णय घेतला.
गावकऱ्यांनी एक खाट आणली आणि त्या खाटेवर महिलेला झोपवलं. ती खाट खांद्यावर घेऊन गावकऱ्यांनी पूर आलेल्या ओढ्यातून पायी प्रवास करत महिलेला रुग्णालयात पोहोचवलं.
या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला असून रस्त्यावरील पुराची समस्या दूर करून द्यावी, अशी गावकऱ्यांनी मागणी केली आहे.