Photo: डोंगराच्या टोकावर देवाचं मंदिर, जीव मुठीत घेऊन भक्त घेतात दर्शन
शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या सुरजागडवरील ‘ठाकूर देवा’ची जत्रा 4 जानेवारी पासून सुरू झाली. दरवर्षी नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात जत्रा भरवण्याची परंपरा कायम आहे. 4 ते 7 जानेवारी असे चार दिवस ही जत्रा चालणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजत्रेच्या तिसऱ्या दिवसांपासून भाविकांची गर्दी वाढते. कारण आदिवासींचे दैवत ‘ठाकूर देवा’चे पूजन तिसऱ्याच दिवशी केले जाते.
तब्बल सात किलोमीटर डोंगर दऱ्या ओलांडून जीव धोक्यात टाकून गड चढाई करून पूजापाठ केली जाते.
खडतर प्रवासानंतर इथे ‘ठाकूर देवा’चे दर्शन मिळते.
जत्रेत पहिल्या दिवशी भाविकांचे आगमन व बिंदिया पूजा दुसऱ्या दिवशी घटस्थापना व सांस्कृतिक कार्यक्रम तिसऱ्या दिवशी गड चढाई व महापूजा तसेच प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन चौथ्या दिवशी इलाखा ग्रामसभा मार्गदर्शन आणि समारोप असे जत्रेचे स्वरूप असते.
मुख्य म्हणजे तिसर्या आणि चौथ्या दिवशीच भाविकांची गर्दी वाढते. ठाकूर देवाची पूजा करण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे तर परराज्यातून सुद्धा भाविक येथे येत असतात. सुरजागड हे गाव एटापल्ली-गट्टा मार्गावर आलापल्लीपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. तर परभणी जिल्हा मुख्यालयापासून ठिकाण 145 किलोमीटरवर आहे.
भाविक मोठ्या उत्साहाने या जत्रेत येत असतात. मात्र, बरेच जण डोंगराच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या ठाकूर देव मंदिरात पोहोचू शकत नाही.
येथे जायला रस्ता नसल्याने जीव धोक्यात टाकून खडतर प्रवास करावा लागतो.
त्यामुळे काहीजण खाली असलेल्या मंदिरातच पूजा करून दर्शन घेतात. परंतु ज्यांची श्रद्धा आहे, जे दरवर्षीच गडावर चढतात असे भाविक अथक परिश्रम घेऊन गडावरील ठाकूर देवाचे दर्शन घेत असतात. सात किलोमीटर अंतर कापून डोंगरावर चढून पूजा करून परत सात किलोमीटर खाली उतरावं लागतं. मात्र, पूजेच्या दिवशी भाविकांना अजिबात त्रास जाणवत नसल्याचे भाविक सांगतात हे विशेष.