Flamingo City : फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच, पाणथळ जमिनीवर सिमेंटच्या इमारती...
फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास येण्याआधीच नवी मुंबई महानगरपालिकेने फ्लेमिंगोच्या अधिवासावर घाला घातला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाणथळ जमीन म्हणून राखीव असलेल्या 300 एकर जागेवरील आरक्षण उठवून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभा करण्यास परवानगी दिली आहे. याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडीकिनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
सुरुवातीला फक्त थंडीच्या काळात येणाऱ्या फ्लेमिंगो पक्षाला येथील वातावरणासोबतच खाद्य मिळू लागल्याने जवळपास 8 ते 10 महिने फ्लेमिंगोचा मुक्काम या ठिकाणी पडू लागला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
नेरुळ येथील चाणक्य तलाव आणि डीपीएस स्कूलच्या शेजारील तलावात यांचा अधिवास मोठ्या संख्येने दिसून येतो. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
परदेशातून येणाऱ्या या फ्लेमिंगोला पाहण्यासाठी नवी मुंबईबरोबर मुंबई , ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत असतात. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
मात्र आता ही आरक्षित असलेली पाणथळ जागा संपविण्याचा निर्णय नवी मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
फ्लेमिंगोच्या अधिवासी जागेवर सिमेंटचे जंगल उभे राहणार असल्याने याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
महानगरपालिकेने पाणथळ जागांचे आरक्षण कायम न केल्यास याबाबत आपण न्यायालयात जावू असा इशारा पर्यावरण प्रेमी सुनिल अग्रवाल आणि भारत गुप्ता यांनी दिला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)
नेरुळ येथील आरक्षित पाणथळ जागेवरील आरक्षण उठवण्यास पर्यावरण प्रेमींबरोबर शिवसेना उध्दव ठाकरे गटानेही विरोध केला आहे. (Photo Credit : Reporter/Vinayak Patil)