सई मांजरेकरचा ग्लॅमरस लूक; काळ्या ड्रेसमध्ये दिसतेय झकास!
सलमान खान स्टारर चित्रपट दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सई एम मांजरेकरने तिच्या एकूण संगोपनाबद्दल खुलासा केला आणि सांगितले की तिला प्रथम इन्व्हेस्टमेंट बँकर बनायचे होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2019 मध्ये ॲक्शन-कॉमेडी दबंग 3 सह तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
अभिनेता आणि चित्रपट निर्माता महेश मांजरेकर यांची मुलगी सईने घनी, मेजर आणि स्कंदा सारखे चित्रपट केले आहेत.
यात गुरु रंधावा मुख्य भूमिकेत आहेत आणि हा चित्रपट हलकाफुलका रोमँटिक-कॉमेडी आहे.
दबंग चित्रपटातील सईच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.
सईने अनेक चित्रपट केले आहेत पण तिला अजून खूप मोठी उंची गाठायची आहे.
सईने नुकतेच तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात सईने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. मोकळे केस सोडून तिने तिचा ग्लॅम लूक फ्लॉन्ट केला आहे.
स्मोकी मेकअपमध्ये सई फारच सुंदर दिसत आहे.