बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू, रुग्णालयाचेही नुकसान
डॉ. संजय महाजन
Updated at:
23 Dec 2024 07:09 PM (IST)
1
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार ग्रामीण रुग्णालयातून एक आगीची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लोणार ग्रामीण रुग्णालयात सामान्य रुग्ण कक्षात आग लागल्याची घटना घडली आहे.
3
या दुर्घटनेत एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
4
तर ही आग नेमकी कशी लागली आणि या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
5
सुदैवाने आग लागली त्यावेळी रुग्णालयात एकच रुग्ण उपचारासाठी भरती होता.
6
हरिभाऊ बापूजी रोकडे अस आगीत होरपळून मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.
7
तर या प्रकरणी लोणार पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
8
मात्र या आगीत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे.