अण्णा हजारे- देवेंद्र फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्यांचा वाकून नमस्कार, मानले आभार; पाहा Photos
राज्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमच अहिल्यानगरमध्ये गेले होते. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हेही उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अण्णा हजारे यांची या लग्नसोहळ्यात भेट झाली, त्यावेळी फडणवीसांकडून अण्णा हजारेचं कौतुक करण्यात आलं. तर अण्णांनी देखील मुख्यमंत्रीपदाबद्दल फडणवीसांचे अभिनंदन केले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे फोटो शेअर करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेतले, तसेच त्यांनी केलेल्या अभिनंदनाबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
पद्मभूषण अण्णा हजारे यांच्यासारखे एक प्रेरणा पुरुष, पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासारखे एक समाजपुरुष समाजासाठी योगदान देत आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच वधु-वरांनी संसारासोबतच समाजकार्यातही पुढील वाटचाल करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अहिल्यानगर शहरात रविवारी सायंकाळी आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष तथा हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचे सुपुत्र प्रसन्न व कापुरवाडी (ता.अहिल्यानगर) येथील अशोक भगत यांची कन्या तनुजा यांचा विवाह सोहळा पार पडला.
नगर-मनमाड रोडवरील हुंडेकरी लॉनवर झालेल्या या सोहळ्यानिमित्त रविवारी दुपारी मुख्यमंत्र्यांसमवेत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण यांच्यासह दिग्गज नेतेमंडळी या सोहळ्यास उपस्थित होते.
गावाला व समाजाला मिळालेली समाजसेवेची परंपरा वधु-वरांनी पुढे चालू ठेवावी, असे म्हणत अण्णा हजारे यांनी नव वधु-वरास आशीर्वाद दिले.