Dagadusheth Ganpati Temple : यंदाचा आंबा महोत्सव जोरात! श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांची आरास
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलाडक्या गणपती बाप्पाला आंब्यांच्या आकर्षक आरास करण्यात आली आहे.
मंदिरावर फुलांनी साकारलेल्या आंब्यांच्या प्रतिकृती... प्रवेशद्वारापासून गाभा-यापर्यंत रंगीबेरंगी फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने गणराया चरणी सेवा अर्पण करण्यात आली.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला.
आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.
यामध्ये गणपती बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला.
पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी श्री देसाई बंधु आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्या वतीने हा नैवेद्य देण्यात आला.
आब्यांची आरास पाहण्यासोबतच गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली होती.