Dhule Ganesh Visarjan : धुळ्यातील मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ, हिंदू बांधवांसाठी भंडारा, तर मुस्लिम बांधवांसाठी गुलाबपुष्प, पहा फोटो
धुळे शहरातील 128 वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या खुनी गणपतीच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधुळे शहरातील जुने धुळे भागातून निघालेली ही मिरवणूक मोठ्या उत्साहात निघाली असून महिला आणि पुरुषांचा मोठा सहभाग या मिरवणुकीत आहे.
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून खुनी गणपतीची ओळख असून मुस्लिम धर्मीय बांधवांकडून आरती करून गणरायाचे स्वागत केले जाते.
विसर्जन मिरवणुकीत प्रथम मानाचा गणपती म्हणून जुने धुळे येथील खुनी गणपतीच्या पूजा करून पालखीतून मिरवणूक दुपारीच काढण्यात आली.
यावेळी टाळ मृदुगांच्या, वारकरी व भजनी मंडळासोबत ही मिरवणूक आग्रा रोडला येऊन पांझरा नदीपात्रात विसर्जन करण्यात येणार आहे.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीच्या स्वागतासाठी भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या असून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात ही विसर्जन मिरवणूक मार्गक्रमण होत आहे.
धुळे शहरासह जिल्हाभरात आज गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह असल्याने शोभायात्रेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन तैनात आहेत.
अनंत चतुर्थी आणि ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर हिंदू बांधवांसाठी भंडारा, तर मुस्लिम बांधवांसाठी गुलाबपुष्प व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.