Ganpati Visarjan : सर्वपक्षीय नेत्यांनी ओढला संस्थान गणपतीचा रथ, संभाजीनगरमध्ये विसर्जन मिरवणुकांना सुरवात
यावेळी करण्यात आलेल्या आरतीत देखील सर्वपक्षीय नेत्यांची हजेरी पाहायला मिळाली. यावेळी पोलीस आयुक्त मनोज लोहिया देखील उपस्थित होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appछत्रपती संभाजीनगरमध्ये वर्षांवर्षाचे परंपरा असून, जोपर्यंत संस्थान गणपतीचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही, तोपर्यंत कुठलेही मंडळ विसर्जन मिरवणूक सुरू करत नाही.
या विसर्जन मिरवणुकीचा रथ सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन ओढत असतात. त्यानुसार आज देखील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, पालकमंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महत्वाच्या नेत्यांची उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला.
तसेच, भागवत कराड, संदिपान भुमरे, अंबादास दानवे यांच्यासह सावे यांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरला.
यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन संस्थान गणपतीच्या मिरवणुकीचा रथ ओढून विसर्जन मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
विशेष म्हणजे, संस्थान गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेला सर्वपक्षीयांसोबत एकत्र दिसलेले चंद्रकांत खैरे विसर्जन मिरवणुकीत मात्र एकत्र दिसले नाही.
खैरे हे सकाळीच आरती करून निघून गेले होते. त्यामुळे, कदाचित गेल्या काही वर्षात खैरे पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीत सार्वजनिक आरतीला थांबले नसल्याची चर्चा पाहायला मिळाली.