अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन उत्साहात, खानदेशी संस्कृतीचा अभ्यास करणारी इटलीची खास पाहुणी आकर्षणाचा केंद्र
खानदेश साहित्य संघ धुळे आयोजित सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे आज ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी या साहित्य संमेलनाचे आकर्षण इटली येथील हेडलवर्क युनिव्हर्सिटी मधील खानदेशी साहित्य संस्कृतीच्या अभ्यास करणाऱ्या अलीचे डिफ्लोरिया या ठरल्या. त्या गेल्या काही वर्षांपासून बोली भाषेचा आणि खानदेशी साहित्य संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत.
अहिराणी बोली भाषेचा जागर व्हावा तसेच भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी गेल्या सहा वर्षांपासून खानदेश साहित्य संघ यांच्या वतीने अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन आयोजित केले जात आहे
यंदा या साहित्य संमेलनाचा मान धुळे शहराला मिळाला असून धुळे शहरातील हिरे भवन येथे दोन दिवस चालणाऱ्या या साहित्य संमेलनाचे आज जेष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनस्थळाला कै चुडामण पाटील साहित्यनगरी हे नाव देण्यात आले
आज शहरातील गांधी पुतळ्यापासून भव्य ग्रंथ दिंडी काढत साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले
माजी मंत्री रोहिदास पाटील धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या उपस्थितीत ग्रंथ दिंडी काढत या साहित्य संमेलनाला सुरुवात झाली
ग्रंथदिंडीत खानदेशातील संस्कृती परंपरा यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते यात कानबाई तगतराव मिरवणूक विवाह संस्कृती, यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते
या ग्रंथ दिंडीत शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.शहराच्या विविध भागातून निघालेल्या या ग्रंथ दिंडीने नागरिकांच लक्ष वेधून घेतलं...