INS Vagir : भारतीय नौदलाची ताकद वाढणार, 'आयएनएस वागीर' पाणबुडी ताफ्यात दाखल होणार
भारतीय नौदलाची (Indian Navy) ताकद आणखी वाढणार आहे. नौदलाच्या ताफ्यामध्ये सोमवारी 23 जानेवारीला 'आयएनएस वागीर' पाणबुडी सामील होणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीने या पाणबुडीची निर्मिती केली आहे.
ही नौदलाच्या ताफ्यातील कलावरी श्रेणीतील पाचवी पाणबुडी आहे. भारतीय नौदलाच्या ‘प्रोजेक्ट 75’ प्रकल्पाच्या अंतर्गत आतापर्यंत कलावरी श्रेणीतील चार पाणबुड्या याआधीच नौदलात सामील झाल्या आहेत.
सोमवारी INS Vagir नौदलात सामील होणार असून या कार्यक्रमासाठी नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय नौदलाला 23 जानेवारीला INS वागीर अटॅक पाणबुडी मिळणार आहे. कलावरी श्रेणीच्या पहिल्या तुकडीतील सहा पाणबुड्यांपैकी ही एक पाणबुडी आहे.
संरक्षण तज्ज्ञ याला 'सायलेंट किलर शार्क' असं म्हणतात. ही पाणबुडी शत्रूला चकवा देणे आणि हल्ला करण्यात सक्षम आहे. शत्रूला कल्पनाही ने येता ही पाणबुडी त्यावर हल्ला करेल.
भारतीय नौदलात सामील होणारी 'आयएनएस वागीर' पानबुडी एक आधुनिक डीझेल-इलेक्ट्रिक अटॅक सबमरीन आहे. आयएनएस वागीर समुद्रात भूसुरुंग टाकण्यास सक्षम आहे.
INS वागीर ही 350 मीटर खोलीवर तैनात केली जाऊ शकते. ही पाणबुडी स्टेल्थ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्यामुळे शत्रू सहजासहजी याचा शोध घेऊ शकणार नाही. यामध्ये जहाजविरोधी क्षेपणास्त्रेही बसवण्यात आली आहेत.
ही पूर्णपणे स्वदेशी पाणबुडी आहे. ही पाणबुडी शत्रूला शोधून अचूक लक्ष्य करू शकते. त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते शत्रूच्या रडारमध्ये येणार नाही.
'आयएनएस वागीर' पाणबुडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यानंतर आता INS Vagir भारतीय नौदलात पाणबुडी सामील करण्यात येईल.