Ambabai Mandir : नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री अंबाबाईची नगरप्रदक्षिणा
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या नगर प्रदक्षिणेसाठी घडवण्यात येणाऱ्या रथाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी जोतिबाच्या चैत्रयात्रेनंतर 6 एप्रिल रोजी होणारा देवीचा रथोत्सव नव्या रथातून साजरा होणार आहे
अंबाबाई मंदिरातील रथ खराब झाल्याने नवीन रथाची निर्मिती देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे.
रथासाठी कर्नाटकातील भाविकाने 12 लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केलं आहे.
अर्पण केलेल्या सागवानी लाकडापासून रथ आणि पितळी उंबऱ्याजवळच्या दरवाजाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
नगरप्रदक्षिणेच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने अंबाबाईचा नवीन रथ बनवला आहे.
साधारण गेल्या दीड महिन्यांपासून या रथाचे काम सुरु आहे.
बनवलेला रथ देखील शेकडो वर्ष टिकणार असल्याची खात्री कारागिरांनी दिली आहे.
15 फूट उंच सागवानी रथाचे संपूर्ण स्ट्रक्चर जवळपास पूर्ण झाले आहे.
साडेतीन फूट उंच जाड लाकडी चाकावर रथ बसवण्याचे काम सुरु असून लवकरच रथ आणि दरवाजा देवीच्या सेवेत दाखल होईल.