Tuljabhavani Temple: संबळाचा कडकडाट, दिवट्या पेटल्या, तुळजाभवानी देवीची दिमाखात छबिना वाघ मिरवणूक!
तुळजाभवानी मातेची शाकंभरी नवरात्र महोत्सवाची घटस्थापनेने सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यानंतर पहिल्या दिवशी म्हणजे मंगळवारी (पौष शुक्ल पक्ष ८) रोजी श्री तुळजाभवानी मातेची प्रक्षाळ पूजा आणि व छबिना वाघ या वाहनवरून पार पडला.
आई भवानीचा उदोकार करित संबळाच्या कडकडाटासह देवीचा छबिना वाघ मंदिरभर फिरला.
शाकंभरी नवरात्राला सुरुवात झाली असून मुर्तीसह देवीचा छबिना तुळजाभवानी देवीची मिरवणूक काढली जाते.
छबिना वाघ मिरवणूकीनंतर देवीच्या मुर्तीची साग्रसंगीत पूजा करण्यात आली.
तुळजाभवानीचा राजेशाही थाट, वाजंत्री, दिवट्या पेटल्या होत्या. भाविकांची गर्दी होती. वाघावर आई भवानीचा बिछान्याचा डौल मोठा होता.
छोटा दसरा म्हणून ओळखला जाणारा शाकंभरी नवरात्र महोत्सव सुरू असून दिनांक 14 पर्यंत दररोज प्रक्षाळ पूजा आणि रात्री छबिण्याचे आयोजन केले जाईल.