आली रे आली, एजन्ट 116 आली, वामिका गब्बी दिसणार 'या' दमदार चित्रपटात, पोस्टर शेअऱ करून दिली माहिती!
बेबी जॉन या चित्रपटामुळे चर्चेत आलेली वामिका गब्बी या अभिनेत्रीला आता चांगलाच ब्रेक मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलवकरच ही अभिनेत्री आता जी-2 या चित्रपटात दिसणार आहे. ती या चित्रपटात आदिवी शेष याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
जी-2 हा चित्रपट एक स्पाय थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाला विनय कुमार सिरिगिनेडी यांनी दिग्दर्शित केलं आहे.
2008 साली हिट ठरलेल्या गुडाचारी या चित्रपटाचा जी-2 हा सिक्वेल असेल. या चित्रपटाची कथा अदिवी शेषने लिहिलेली आहे.
विशेष म्हणजे वामिका गब्बीने या चित्रपटाचे एक पोस्टरदेखील शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये ती काळ्या रंगाच्या कपड्यांत अदिवी शेषसोबत दिसत आहे.
ती याआधी बेबी जॉन या चित्रपटातही झळकली होती.
बेबी जॉन या चित्रपटात तिने वरुण धवन आणि कीर्तिसुरेश यासारख्या प्रसिद्ध कालाकारांसोबत स्क्रीन शेअर केली होती.
वामिका गब्बी