टिपेश्वर वरून आलेल्या वाघाचा येडशी परिसरात मुक्काम; तिसऱ्यांदा कॅमेऱ्यात छबी कैद
टिपेश्वर अभयारण्यातून आलेला वाघ येडशी परिसरात तिसऱ्यांदा वन विभागाने बसवलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवन विभागाच्या माहितीनुसार, 19 डिसेंबर रोजी येडशीतील रामलिंग अभयारण्यात पहिल्यांदा वाघ कॅमेऱ्यात कैद झाला होता.
त्यानंतर 24 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास ढेंबरेवाडी शिवारात पानवट्यावर वाघ दिसला.
तिसऱ्यांदा, 25 डिसेंबर रोजी मध्यरात्री ढेंबरेवाडी तलावाजवळून येडशीच्या दिशेने जाताना वाघ कॅमेरात पुन्हा टिपला गेला.
वाघाच्या या सततच्या हालचालींमुळे वन विभाग अधिक सतर्क झाले आहे.
अभयारण्य परिसरात विशेष खबरदारी घेतली जात आहे.
वाघाच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने विशेष पथक तयार करण्यात आले आहे.
वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात आहे.
स्थानिक नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वाघाच्या या हालचालींमुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.
वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.