Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
गुंतवणूकदारांकडून म्युच्यूअल फंडमध्ये एसआयपीद्वारे दरमहा ठराविक रकमेची गुंतवणूक केली जाते त्याला एसआयपी म्हटलं जातं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाधारणपणे म्युच्यूअल फंडमधील गुंतवणुकीवर 12 टक्के परतावा मिळतो असं ग्रहित धरलं जातं. जेव्हा एखाद्या फंडमध्ये तुम्ही 10 वर्ष गुंतवणूक करता त्यावेळी हा परतावा मिळवण्यासाठी योग्य टप्पा देखील समजला जातो.
जेव्हा तुम्ही एखाद्या फंडमध्ये दरमहा 5 हजार रुपयांची एसआयपी 10 वर्ष करता तेव्हा तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम 6 लाख रुपये असते. यावर 12 टक्क्यांप्रमाणं तुम्हाला 5,61,695 रुपये प्रमाणं परतावा मिळू शकतो. म्हणजेच तुम्हाला 10 वर्षानंतर 11.61 लाख रुपये मिळू शकतात.
जेव्हा तुम्ही 10 हजार रुपये एखाद्या फंडमध्ये गुंतवणूक करता त्यावेळी 10 वर्षातील गुंतवणूक 12 लाख रुपयांची होते. त्यातून 12 टक्के परतावा मिळाल्यास ही रक्कम 23.23 लाख रुपये होते.
जर तुम्ही 15 हजार रुपयांची एसआयपी एखाद्या फंडमध्ये 10 वर्षांसाठी केल्यास तुमची गुंतवणूक साधारणपणे 18 लाख रुपये होते. 12 टक्क्यांप्रमाणं तुम्हाला 16 लाख 85 हजार रुपये परतावा मिळू शकतो. म्हणजेच एकूण 34 लाख 85 हजार रुपये 10 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर मिळतील. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)