Photo: इम्तियाज जलील यांच्याविरोधात भाजप रस्त्यावर, पाहा फोटो
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्याच्याविरोधात आंदोलन करत भाजप कार्यकर्त्यांनी जलील यांचा फोटो जाळून, पायाखाली तुडवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ आणि इम्तियाज जलील यांच्या विरोधात आता भाजपचे पदाधिकारी (BJP) रस्त्यावर उतरले आहे.
सोमवारी (6 मार्च) रोजी शहरातील टीव्ही सेंटर भागातील संभाजी महाराज चौकात भाजपने जोरदार निदर्शने केले आहे.
यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
तसेच इम्तियाज जलील यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला.
मात्र पोलिसांनी पुतळा ताब्यात घेऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडला.
दरम्यान असा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणावर उपस्थिती पाहायला मिळाली.