Photo : नामांतराविरोधात आणि समर्थनात अर्ज दाखल करण्यासाठी मोहीम
या नामांतराच्या शासन निर्णयाविरोधात विभागीय आयुक्तालयात 27 मार्चपर्यंत आक्षेप, हरकती नोंदविण्याची मुदत देण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतर ठाकरे गटाकडून 20 हजार पोस्ट कार्ड नामांतराच्या समर्थनार्थ विभागीय आयुक्त कार्यलयात दाखल केले जाणार आहे.
दरम्यान सोमवारी (13 मार्च) सायंकाळपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयात 11 हजार 767 आक्षेप, हरकतींची नोंद झाली.
तर छत्रपती संभाजीनगरच्या समर्थनार्थ 35 हजार अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
त्यामुळे आता सुट्टीचे दिवस वगळून फक्त नऊ दिवस समर्थन आणि आक्षेप अर्ज दाखल करण्यासाठी शिल्लक आहेत.
त्यामुळे आता शहरात वेगवेगळ्या ठिकाणी मोहीम राबवून नामांतराविरोधात आणि समर्थनात अर्ज भरवून घेतले जात आहे.
विशेष म्हणजे या मोहिमेत तरुणांचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद बचाव संघर्ष समितीकडून देखील आक्षेप घेणारे अर्ज भरून घेतले जात आहे.