Chandrapur News: मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या रडारवर; ताडोबासह पेंच, मेळघाटला ‘रेड अलर्ट’
मध्य भारतातील व्याघ्र प्रकल्प सध्या शिकाऱ्यांच्या रडारवर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट आणि गडचिरोली जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने हा रेड अलर्ट जारी केला आहे.
काही दिवसांपूर्वी आसाममध्ये एका वाघाची कातडी जप्त करण्यात आली होती
ही कातडी मध्य भारतातील वाघाची असल्याचा संशय आहे.
त्यामुळे आपल्या राज्यातील ताडोबासह पेंच, मेळघाट, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्राबरोबरच मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याला देखील संशयीत शिकाऱ्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यास सांगण्यात आले आहे.
हा अलर्ट मिळताच चंद्रपूर जिल्हातील टायगर सेलची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना खबरदारीची सूचना देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात 2012 च्या दरम्यान वाघांच्या शिकारीच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात या अलर्ट बाबत विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.