Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Happy Birthday Sunil Gavaskar : रिटायरमेंटच्या तीन दशकांनंतरही कोट्यवधींची कमाई, सुनील गावस्करांची एकूण संपत्ती किती?
सुनील गावस्कर यांचा जन्म 10 जुलै 1940 रोजी झाला. गावस्कर यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 13,214 धावा केल्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुनील गावस्कर 74 वर्षांचे झाले आहेत. गावस्कर यांनी 1971 ते 1987 पर्यंत टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे.
गावसकर यांनी क्रिकेटला अलविदा करून अनेक वर्षे उलटली आहेत, पण तरीही त्यांची कमाई कोट्यवधींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची एकूण संपत्ती 250 कोटी रुपये आहे. पण, गावस्कर यांच्या एकूण संपत्तीची ही माहिती अधिकृत नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, सुनील गावस्कर यांची मासिक कमाई दोन कोटींच्या जवळपास आहे. ते दरवर्षी सुमारे 25 कोटी कमावतात. गावस्कर यांची बहुतांश कमाई कॉमेंट्री आणि जाहिरातींमधून होते.
कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारे सुनील गावसकर हे पहिला फलंदाज होते. गावस्कर यांनी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात तीन शतके झळकावणारे पहिले फलंदाज ठरले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गावस्कर यांनी 125 कसोटी आणि 108 एकदिवसीय सामने खेळले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून खेळणाऱ्या सुनील गावस्कर यांनी एकूण 348 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
सुनील गावस्कर यांनी 214 कसोटी डावांमध्ये 51.12 च्या सरासरीने 10122 धावा केल्या.
गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 34 शतकं आणि 45 अर्धशतकं झळकली आहेत. यामध्ये नाबाद 236 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.
सुनील गावस्कर यांनी वनडेमध्ये 35.13 च्या सरासरीने 3092 धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांनी एक शतक आणि 27 अर्धशतके झळकावली.