Flood : आभाळ फाटलं, घर पाण्यात, संसार उघड्यावर; हिमाचलमधील जलप्रलयाची भीषण दृश्ये
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2023 12:13 PM (IST)
1
मुसळधार पावसामुळे उत्तर भारतात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
हिमाचल प्रदेशातील मंडी आणि कुल्लू इथे सतत पडणाऱ्या पावसामुळे ब्यास नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे
3
यामुळे विविध भागात भूस्खलन आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे.
4
पाण्याच्या जोरदार प्रवाहात रस्ते आणि पूलही वाहून गेले.
5
ब्यास नदीची पाणीपातळी वाढल्यामुळे मंडी जिल्ह्यातील नागवाईन गावाजवळ सहा जण अडकले होते.
6
मुसळधार पावसामुळे ब्यास नदीत पंचवक्त्र मंदिर बुडालं आहे.
7
तसंच पावसामुळे रविवारी पंचवक्त्र पूल कोसळला.
8
अनेक वाहनं पुरात अडकली असून काही वाहने जोरदार प्रवाहात वाहून गेली आहेत.
9
हिमाचलमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
10
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.