Champa Shashthi 2024 : यळकोट यळकोट...जय मल्हार! चंपाषष्ठी षडरात्र महोत्सवानिमित्त जेजूरी गडावर 551 महिलांकडून हरिद्रामार्चन महापूजा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Dec 2024 06:05 PM (IST)
1
श्री मार्तंड देवस्थान जेजुरी व श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्ट यांच्या वतीने चंपाषष्ठी षडरात्र महोत्सवानिमित्त श्री म्हाळसाकांत हरिद्रामार्चन महापूजा व महाआरती महिलांच्या शुभहस्ते संपन्न झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या कार्यक्रमात जवळपास 551 महिलांनी सहभाग नोंदवला.
3
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या ठिकाणी दरवर्षी ऋषीपंचमीला महिलांचे अथर्वशीर्ष पठण होत असतं.
4
तसेच नवरात्रीमध्ये देवीचे कुंकू मार्जन पूजा होते.
5
या दोन्ही उपक्रमाच्या अनुषंगाने खंडेरायाच्या दारातही महिलांकडून महाआरती हरिद्रामार्चन पूजा व्हावी, या दृष्टिकोनातून हा संकल्प प्रथमच घेण्यात आला.
6
पूजा झाल्यानंतर महिलांनी एकत्रित खंडेरायाची आरती केली.
7
या वेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.