Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात मोठा अपघात, कंटेनर-टेम्पो-बस एकमेकांवर धडकल्या, 10 जण जखमी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे त्यात आज या महामार्गावर परशुराम घाटात पुन्हा अपघात झाला आहे.
Accident
1/6
परशुराम घाटात कंटेनर,टेम्पो आणि बसचा अपघात झाला आहे त्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
2/6
जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या खेड आणि चिपळूण मधील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
3/6
MIDC मधून शिफ्ट संपवून कर्मचाऱ्यांना घरी नेणाऱ्या बसवर, कंटेनर पलटी झाल्यामुळे कर्मचारी जखमी झाले आहेत.
4/6
या अपघातानंतर घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.
5/6
वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे परशुराम घाटातील वाहतुकीचा प्रश्न एरणीवर आहे.
6/6
अश्या परिस्थितीत वाहन चालक सध्या जीव मुठीत धरून प्रवास करीत आहेत.
Published at : 03 Dec 2024 04:01 PM (IST)