Buldhana Royal Wedding : पशुपक्षांसह मुंग्यानाही पंगत, दहा हजार नागरिकांना जेवणावळी; बुलढाण्यातील शाही विवाहाची चर्चा
बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक कन्येचा विवाह सोहळा पार पडला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयात नवल काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण मंडळी या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता.
गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवाहाचं निमंत्रण देण्यात आलं आणि जवळपास दहा हजार लोकांना जेवणही.
इतकंच काय तर सरोदे यांनी परिसरातील गुरे, पशू पक्ष्यांनाही पंगत दिली.
यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुका चारा, परिसरातील श्वानाना पंगत इतकंच काय तर परिसरातील मुंग्या ही उपाशी राहू नये म्हणून मुंग्यांना दोन पोते साखर टाकण्यात आली.
या शाही विवाह सोहळ्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून काळजी घेण्यात आली.
प्रकाश सरोदे यांनी आपल्या लाडक्या कन्येचा म्हणजेच पूजाचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला.
मोठ्या थाटात आणि शाही पद्धतीने केल्याने तसंच विवाहात मुक्या प्राण्यांची ही काळजी घेतल्याने या विवाहाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.