Kokan Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी बाला शेखची सुरु असलेल्या सामन्यातून माघार, कोकण केसरी स्पर्धेतील प्रकार
महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) बाला शेखनं (Bala Rafiq Sheikh) कुस्तीच्या आखाड्यातून माघार घेतली. त्याने सुरु सामन्यातून मैदान सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचिपळूणमध्ये (Chiplun) सध्या कोकण केसरी स्पर्धेचा (Kokan Kesari 2023) थरार सुरु आहे. चिपळूण मध्ये रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari 2018) बाला रफिक शेख यानं सुरू कुस्तीच्या सामन्यात मैदान सोडलं.
पंचांचा निर्णय न पटल्यामुळे नाराज झालेल्या बाला रफिक शेखने कुस्तीच्या आखाड्यातून घेतली.
चिपळूणमधील खेर्डी येथे कोकण केसरीच्या पहिल्या स्पर्धेच्या दरम्यान हा प्रकार घडला. महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख आणि महाराष्ट्र उपकेसरी प्रकाश बनकर यांच्यात लढत सुरू होती.
यावेळी पंचाचा निर्णय न पटल्याने त्याने सुरु सामन्यातून माघार घेतली. दरम्यान, वरिष्ठांच्या मध्यस्ती नंतर बाला पुन्हा मैदानात उतरला. मात्र, कुस्तीचा निकाल न लागल्याने सामना बरोबरीत संपला.
बाला रफिक शेखने पुण्याच्या अभिजीत कटकेचा पराभव करून महाराष्ट्र केसरी 2018 चं विजेतेपद पटकावलं आहे.
बाला रफिक शेख हा मूळचा सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील खडकी गावचा रहिवासी आहे. त्याची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे.
दोन वेळचा खुराक मिळणेसुद्धा आव्हानात्मक असणाऱ्या बालाच्या गेल्या पाच पिढ्या कुस्तीची परंपरा जोपासली आहे.