Buldhana News: बुलढाण्याच्या मातीत वाघ्या मुरळीच्या घुंगराचा नाद; देऊळगाव माळी गावात झाली राज्यस्तरीय वाघ्या मुरळी स्पर्धा
बदलत्या काळाच्या ओघात अनेक अस्सल लोककला लूप्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी काही कलावंतांनी प्राचीन काळापासून चालत आलेल्या प्राचीन कला आजही जीवंत ठेवल्या आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागरण, गोंधळ घालणाऱ्या वाघ्या-मुरळीचा आवाज ग्रामीण भागात आजही गुंजत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
तोच घुंगरांचा नाद मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे वाघ्या मुरळीची राज्यस्तरीय भव्य स्पर्धेत गुंजला.
यामध्ये परभणी ,औरंगाबाद ,बुलढाणा ,जालना ,नाशिक ,जळगावासह इतर जिल्ह्यातील वाघ्या मुरळी पार्टीने सहभाग नोंदविला होता.
या वाघ्या मुरळीच्या जागरण गोंधळ स्पर्धेच्या कार्यक्रमांमधून स्त्री भ्रूणहत्या, लेक वाचवा, लेक शिकवा, व्यसनाधीनता, ग्रामस्वच्छता, स्वच्छ भारत मिशन, बालविवाह नको, एकत्र कुटुंब पद्धती, आई-वडिलांचा सांभाळ करा, वृद्धाश्रम नको, अशा अनेक समाजप्रबोधनाच्या गीताच्या माध्यमातून समाज जागृती करत ही भव्य दिव्य स्पर्धा संपन्न झाली.
या स्पर्धेत शिव वाघ्या मंडळ किनगाव राजा या मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते. अपत्यप्राप्तीसाठी किंवा मूल जन्माला येऊनही जगत नसेल, तर खंडोबाला नवस करणारे मातापिता ‘मला मूल होऊ दे, ते जगल्यास मी तुला अर्पण करीन’, असा नवस करायचे.
नवसानंतर जन्मास आलेले मूल खंडोबाला अर्पण केले जायचे. मुलगा असल्यास त्याने वाघ्या; तर मुलगी असल्यास तीने मुरळी म्हणून संपूर्ण जीवन जगायचे, असा वाघ्या-मुरळीचा इतिहास असल्याची माहिती गुंजकर यांनी दिली.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खंडोबाची एकूण 11 ठाणी असून तेथे लग्न, मुंजीनंतर वाघ्या-मुरळींकडून जागरण घातले जाते अशी महाराष्ट्रात संस्कृती आहे.
वाघ्या-मुरळी यांना खंडोबाचे उपासक म्हणून ओळखले जाते