Buldhana Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे एकफळ गावाची दैना, रस्ता नसल्याने नागरिकांचा जीवघेणा प्रवास
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील एकफळ गावातील नागरिकांना अवकाळी पावसामुळे जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या चार दिवसांपासून सातत्याने या परिसरात कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे एकफळ गावाचा संपर्क तुटला आहे.
त्यामुळे भर उन्हाळ्यात या गावातील नागरिकांना चिखल तुडवत आणि रेल्वे रुळावरुन जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
गावाला रस्ताच नसल्यामुळे आणि गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे या गावात दुचाकीही जाण्यास तयार नाही.
त्यामुळे गावातील आजारी रुग्णांना शाळकरी मुलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना जीवघेणा संघर्ष करत रेल्वे रुळावरुन पाच किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.
भर उन्हाळ्यात या नागरिकांना अवकाळी पावसामुळे या यातना सहन करावा लागत आहेत तर पावसाळ्यात या नागरिकांच्या हाल न विचारलेलेच बरे.
या गावाला रस्ताच नसल्यामुळे या गावातील 30 ते 35 तरुणांचे लग्न जुळत नसल्याचाही गावकरी सांगत आहेत.
गावाला रस्ता नसल्यामुळे या गावात या तरुणांना कुणी मुलगीही देत नाही हे भीषण वास्तव अवकाळी पावसाने निमित्त समोर आलेलं आहे.
गेल्या चार दिवसांपासून भर उन्हाळ्यात आणि अवकाळी पावसामुळे या गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने गावकरी उद्विग्न झाले आहेत.