Bhandara : भंडाऱ्यात शेतकऱ्यांसाठी सलाम किसानचा पुढाकार
शेतकऱ्यांसाठी सलाम किसानने (Salam Kisan) पुढाकार घेतला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसलाम किसान ही एक चळवळ म्हणून शेतकऱ्यांसाठी काम करणारा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे.
तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे. भंडाऱ्यातील (Bhandara) पवनी येथे शेतकऱ्यांना ड्रोनचे प्रशिक्षणही देण्यात आले.
सलाम किसानच्या माध्यमातून शेतीला लागणारा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतला आहे
तंत्रज्ञानामार्फत अवघ्या 90 सेकंदात आता माती परीक्षण केलं जात आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता मिळवण्यासाठी सलाम किसानने पुढाकार घेतल्याची माहिती अग्री ऑपरेशन मॅनेजर परेश कुल्लरकर यांनी दिली.
शेतकऱ्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि कमी खर्चात त्यांच्या शेतीचं योग्य नियोजन व्हावं, यादृष्टीनं भंडाऱ्यातील पवनी इथं सलाम किसानच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण आणि माती परीक्षण आयोजित केलं होतं.
पिकांवर फवारणी करण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी ड्रोन फवारणी, आधुनिक साधने सलाम किसान अगदी अल्प दरात उपलब्ध करुन देत आहे.
शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचं आयआयटी कानपूरनं तयार केलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अगदी 90 सेकंदात माती परीक्षण करुन देण्यात आलं.
माती परीक्षणाला दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत होता. आता केवळ 90 सेकंदात त्याचा निकाल मिळणार असल्यानं शेतकरी सुखावला आहे.