Photo: भंडाऱ्यातील पन्नाशी गावात 50 कुटुंबं, सगळ्यांचं आडनावं सारखीच अन् व्यवसायही सेम
तुम्ही शाळेत असताना तुमच्या मित्र-मैत्रिणींची एकसारखी आडनावं तुम्ही ऐकली असणार. त्यावरून शाळेत अनेकदा हजेरीचा आणि नावांचा गोंधळ झालेला पाहिला असेल. पण गावातील सगळ्याच लोकांचं आडनाव सारखंच, नुसतं आडनावच काय तर त्यांची जात आणि व्यवसायही सारखाच असेल तर?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही बातमी कोणत्या सिनेमाची स्टोरी नव्हे, तर भंडाऱ्यातील पन्नाशी गावातील खरीखुरी कहाणी आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील डोंगराच्या पायथ्याशी जंगलव्याप्त भागात वसलेलं पन्नाशी हे गाव.
गावाच्या नावाप्रमाणेच या गावात पन्नासच घरं आणि या गावात सर्वांची एकच आडनावं कशी हा प्रश्न आपणास पडला असेल. पण हे सत्य आहे. या गावात सर्वांचीच आडनावं शेंडे आहेत.
दीडशे वर्षापूर्वी या गावात एक कोसरे माळी समाजाचे शेंडे कुटुंबीय राहण्यासाठी आले. त्यांनी हळूहळू आधी फुलशेती फुलवली आणि त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयातील आणखी काही परिवार येथे राहण्यासाठी आलेत.
त्यामुळे गावात सर्व शेंडे आडनावाचे 50 कुटुंबं तयार होत, आता 150 नागरिक वास्तव्य करू लागलेत, तेही एकच आडनावाचे. आता शेंडे कुटुंबं भाजीपाला शेतीसह फुलशेतीकडे वळले आहे.
आता हे शेंडे परिवारातील नागरिक पन्नाशी गावात मोठ्या गुण्यागोविदाने नांदत आहेत. एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत आहेत. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने एकत्रित येत ते साजरे केले जातात.
नागरिकांच्या सांगण्यानुसार गावात कधीही भांडण-तंटे झाले नसल्याची माहिती आहे. यावरच या छोट्याशा गावाची महती थांबत नाही तर, गावातील सर्वच नागरिक भाजीपाल्याची शेती करीत असून येथील भाजीपाला संपूर्ण भंडारा जिल्ह्यात प्रसिध्द आहे.
देशभरात कोरोनाची लाट असताना या गावातील नागरिकांनी कोरोनाला आपल्या गावातील वेशीपर्यतसुद्धा येऊ दिले नाही.
जर राज्यातील प्रत्येक गावातील नागरिक पन्नाशी या छोट्याशा गावातील नागरिकांप्रमाणे गुण्यागोविंद्याने भांडण तंटे न करता राहिले तर पोलीसांचा ताण नक्कीच कमी होईल.
तेव्हा राज्यातील प्रत्येक गावाने पन्नाशी या गावाचा आदर्श नक्कीच घ्यायला हवाच.