PHOTO: परभणीत शिंदे गटाचा ठाकरे गटासह विरोधकांना झटका

Parbhani News: राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील वाद चांगलाच तापला आहे.

Eknath Shinde

1/7
शिंदे-ठाकरे गटात फोडाफडीचे राजकारण पाहायला मिळत आहे.
2/7
दरम्यान परभणी जिल्ह्यात शिंदे गटाने ठाकरे गटासह विरोधकांना झटका दिला आहे.
3/7
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ठाकरे गटातील नेत्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
4/7
चाळीस सरपंच, उपसरपंच, सभापती, पंचायत समिती सभापती, ग्रामपंचायत सदस्य, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
5/7
याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे.
6/7
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष सरपंचांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
7/7
आगामी स्थानिक निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
Sponsored Links by Taboola