Beed Ramadan Roja : अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार ची पंगत!
रामनवमीपासून राज्यात आणि देशात काही ठिकाणी जातीय तीळ निर्माण होईल अशा काही घटना घडल्या मराठवाड्यात तर दोन घटना मुळे सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले मात्र बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर पाटोदा या गावांमध्ये हरिनाम सप्ताहात रोज इफ्तार पार्टी चे आयोजन करून सामाजिक सलोख्याचे एक चांगले उदाहरण दाखवून दिले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथे दरवर्षी प्रमाणे
अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार च्या पंगती चे आयोजन करण्यात आले होते
यावेळी सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवून आम्ही सर्व गावकरी एक आहोत असा मोठा सामाजिकसंदेश दिला आहे
पाटोदा गावात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अखंड हरीनाम सप्ताह चे आयोजन सर्व गावाकऱ्या च्या वतीने करण्यात आले होते
राम नवमी ते हनुमान जयंती या दरम्यान सप्ताह चे आयोजनाची 29 वे वर्ष आहे.
काल्या च्या कीर्तन नंतर महाप्रसाद साठी सर्व गावकरी सहभागी असतात पण गावातील मुस्लिम बांधवाना रमजान चे रोजे सुरु असल्याने सप्ताहात त्यांच्या रोजा इफ्तार ची पंगतिचे आयोजन करण्यात आले
एकदरीत गावची सामाजिक ऐक्याची परंपरा आहे.
सर्व सण उत्सव सामाजिक धार्मिक उत्सव एकमेकांना सहभागी करून घेऊन साजरे करण्यात येतात
राजकीय दृष्ट्या सुद्धा निवडणूक संपली कि दुसऱ्या दिवशी पासून सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित काम करतात हे विशेष
अखंड हरीनाम सप्ताहात मुस्लिम बांधवासाठी रोजा इफ्तार ची पंगत! बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा च्या गावाकऱ्यांनी सामाजिक ऐक्या चे दिले उत्तम उदाहरण