Sindhudurg : कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलले, सुट्यांमुळे समुद्रकिनारी, मंदिर आणि किल्ल्यांवर गर्दी!
कोकणातील समुद्र किनाऱ्यांसह मालवण मधील दांडी समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांनी गर्दी केली आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमौज मज्जा करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक तळकोकणात दाखल झाले आहेत.
मालवण बंदर, दांडी, चिवला समुद्र किनारा, रॉक गार्डन, तारकर्ली, देवबागसह सिंधुदुर्गमधील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत
जलक्रीडा पर्यटनाचाही पर्यटक आनंद लुटत आहेत
बिहार वरून खास कोकणात पर्यटनासाठी आले आहेत
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, तारकर्ली, देवबाग, तळाशील, शिरोडा समुद्रकिनारी पर्यटकांची तोबा गर्दी झाली आहे.
कोकणातील समुद्रकिनारी तसेच विविध पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची गर्दी आहे.
कोकणचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात.
त्यातही डॉल्फिन सफर, कांदळवन सफर आणि विदेशी पक्षांची नजरेची पारणं फेडणारी दृश्य पर्यटकांना आकर्षित करत आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटक समुद्र साहसी जलक्रीडांचा आनंद लुटत आहेत. शिवाय सिंधुदुर्ग किल्ला पाहणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील मोठी आहे. त्यासोबतच मालवणी खाद्य संस्कृतीची सुद्धा अनुभव घेत आहेत.