Beed : पंकजा मुंडे यांच्या हस्ते गोपीनाथ गडावर घटस्थापनेची विधीवत पूजा, पाहा फोटो
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहरातील प्रसिद्ध अशा काळरात्री मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्या अगोदर सकाळी गोपीनाथ गडावरील देवीच्या मंदिरात त्यांच्या हस्ते विधीवत पूजेने घटस्थापना करण्यात आली.
राज्यातील सर्व सामान्य जनता, शेतकरी यांच्या सुख-समृध्दीसाठी त्यांनी देवीकडे प्रार्थना केली.
शारदीय नवरात्रोत्सवास आजपासून सर्वत्र मोठया उत्साहात सुरवात झाली.
परळीतही ठिकठिकाणी देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली. पंकजा मुंडे आणि खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी सकाळी गोपीनाथ गडावर असलेल्या देवीच्या मंदिरात विधीवत पूजा करून घटस्थापना केली.
माहुरची रेणुकामाता, कोल्हापूरची अंबाबाई आणि तुळजापूरची भवानी आई अशा तीनही देवींच्या सुंदर व सुबक मुर्त्या याठिकाणी मंदिरात स्थापित करण्यात आलेल्या आहेत
घटस्थापनेनंतर परळी शहरातील प्रसिद्ध असलेल्या काळरात्री देवीच्या मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले व मंदिर परिसराची पाहणी केली.
शक्ती आणि भक्तीचे प्रतीक असलेल्या आदिशक्तीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली.
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त वातावरणात साजरा होत असलेल्या नवरात्रोत्सवाने राज्यासह देशभरात चैतन्याचे वातावरण आहे...
नवरात्रोत्सवानिमित्त राज्यातील शक्तीपीठं गजबजलीत... साडेतीन शक्तीपीठं असलेल्या देवस्थानांमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय.