4WD फीचर, माईल्ड-स्ट्रॉंग हायब्रीड इंजिन; नवीन Maruti Grand Vitara भारतात लॉन्च
बहुप्रतीक्षित Maruti Grand Vitara अखेर भारतात लॉन्च झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appही कार लॉन्च होण्याआधीच याच्या 55 हजार युनिट्सची बुकिंग (Maruti Grand Vitara 2022 Booking) झाली आहे.
कंपनीने ही कार माईल्ड-हायब्रीड आणि स्ट्रॉंग हायब्रीड प्रकारात लॉन्च केली आहे.
ही कार कंपनीची फ्लॅगशिप कार आहे. यात कंपनीने 4-व्हील ड्राइव्ह (4WD) प्रणाली सारख्या आधुनिक फीचर्सचाही पर्याय दिला आहे. तसेच माईल्ड आणि स्ट्रॉंग अशा हायब्रीड इंजिन पर्यायासह ही कार यात देण्यात आला आहे.
ही कार कर्नाटकातील टोयोटाच्या प्लांटमध्ये तयार करण्यात आली आहे. Toyota Hyryder आणि Maruti Grand Vitara याचा प्लांटमध्ये एकसोबत विकसित करण्यात आली आहे.
सिग्मा, डेल्टा, झेटा, अल्फा, झेटा +, अल्फा + या सहा ट्रिममध्ये कंपनीने ग्रँड विटारा एकूण 11 प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये ही एसयूव्ही ऑटोमॅटिक, मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्ससह सादर करण्यात आली आहे.
Grand Vitara चे इंजिन Toyota Hyryder सोबत शेअर केले आहे. हे K15C माईल्ड-हायब्रीड पेट्रोल इंजिनसह येते. जे 103 Bhp पॉवर जनरेट करते.
याशिवाय, ग्रँड विटाराला 1.5-लिटर, 3-सिलेंडर अॅटकिन्सन सायकल पेट्रोल इंजिन हायराइडरकडून मिळाले आहे. जे इलेक्ट्रिक मोटरशी जोडलेले आहे. हे इंजिन 79 Bhp पॉवर आणि 141 Nm टॉर्क जनरेट करते.
नवीन ग्रँड विटारामध्ये 6-स्पीकर अर्केमी ऑडिओ सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो, अॅपल कारप्ले, एअर फ्रंट सीट्स, अॅम्बियंट लाइटिंग, हेड्स-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक सनरूफ आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहे .
सुरक्षिततेच्या दृष्टीने मारुती ग्रँड विटारामध्ये सहा एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, सराउंड व्ह्यू मॉनिटर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि ABS-EBD सारखे फीचर्स देण्यात आले आहे.