Photo : राजधानी दिल्लीत पाऊस, थंडीचा कडाका वाढला
देशात वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. काही ठिकाणी थंडीचा जोर आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. दिल्लीत जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी लावली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिल्लीत पावसाची हजेरी. पावसानंतर वातवरणात गारवा वाढला आहे. थंडी वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत.
देशाच्या अनेक भागात थंडी वाढली. तसेच अनेक ठिकाणी धुके पडले आहे. धुके पडल्यामुळं वागने चालवण्यास अडथळे निर्माण होत आहेत.
दिल्लीत वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसानंतर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या 2 दिवसात दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळाला होता. कारण दिल्ली NCR चे किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढले होते. मात्र, पावसानंतर पुन्हा एकदा किमान तापमानात घसरण झाली आहे.
दिल्लीत कडाक्याची थंडी पडली (Cold Weather) आहे. दिल्लीतबरोबरच उत्तर प्रदेश पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या ठिकाणीही थंडीचा जोर वाढला आहे.
पाऊस पडण्यापूर्वी, दिल्ली एनसीआरमध्ये सरासरी कमाल तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस होते. काल किमान तापमान 12 अंश सेल्सिअस होते. पावसानंतर त्यात काहीशी घट झाली.
उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, बिहारमध्ये 13 जानेवारी 2023 पर्यंत थंडी राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
पुढील 3 दिवसांत मध्य भारतातील अनेक भागांमध्ये किमान तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर तापमान 2 ते 4 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता आहे.
दिल्लीत कडाक्याची थंडी पडली (Cold Weather) आहे. दिल्लीतबरोबरच उत्तर प्रदेश पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश या ठिकाणीही थंडीचा जोर वाढला आहे.