Beed: बीडमधून मांजरा नदी संवाद यात्रेची सांगता, पाहा फोटो
आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून राज्यातील 75 नद्या यांची संवाद यात्रा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी वर्धेच्या सेवाग्राम मधून केला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयाचाच एक भाग म्हणून मांजरा नदीचे संवाद यात्रा मागच्या आठवड्याभरापासून सुरु झाली.
बीड जिल्ह्यातील गोवळवाडी येथून मांजरा नदीच्या उगम स्थानापासून सुरू झालेली ही मांजरा संवाद यात्रा आपला आठ दिवसाचा बीड जिल्ह्यातील प्रवास करून आज या प्रवासाची सांगता झाली.
उद्या मांजरा नदी संवाद यात्रा ही लातूर जिल्ह्यात पोहोचेल आणि तिथून पुढे कर्नाटक आणि तेलंगणा असा प्रवास करेल.
बिड जिल्ह्यातील चला जाणूया मांजरा नदीला अभियानाचा समारोप अंबाजोगाई तालुक्यातील देवळा या गावी झाला.
पाटोदा तालुक्यातील गवळवाडी येथून निघालेले चला जाणूया नदीला अभियान पुढे लातूर जिल्ह्यात जाणार आहे.
देवळा येथे बिड जिल्ह्यातील अभीयानाचा समारोप चला जाणूया नदीला अभियानाचे राज्य समिती सदस्य अनिकेत लोहिया, मानवलोकचे सहकार्यवाह लालासाहेब आगळे, गावचे सरपंच रावसाहेब यादव , इन्फंट इंडियाचे दत्ता बारगजे, ग्राम पंचायत सदस्य,ग्रामसेवक, नदीयात्री, कृषी विभागाचे सूर्यकांत वडखेलकर, राजाराम बन, वनविभागाचे कस्तुरे व इतर अधिकारी कर्मचारी, गावातील मुख्याध्यापक, शिक्षक शालेय विद्यार्थी, महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या
यावेळी गावातील महिलांनी जल कलशाचे पूजन केले. गावकऱ्यांनी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल श्रीफळ देऊन केले. त्यानंतर शाहीर सुधाकर देशमुख,राजू शेवाळे यांच्या नदीचा गोंधळ सादर करून जनजागृती केली.
नदी, नीर, नारी यांचा ज्या समाजात पावित्र्य राखले जाते, तो समाज सुसंस्कृत समजला जातो. त्यामुळे अशा जीवनदायिनी नदीची आजची स्थिती काय आहे. तिला सतत वाहत कसे ठेवता येईल तिला अमृत वाहिनी कसे करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी ही चला जाणूया नदीला अभियान राबवण्यात येत आहे.