Beed News : परळीतल्या पंचम ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिराला फुलांची सजावट, दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ
मंदिरात पहाटेपासूनच प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाविक भक्तांच्या गर्दीने वैद्यनाथ मंदिर परिसर फुलला आहे.
यानिमित्ताने संपूर्ण राज्यभरातून भाविक परळीत दाखल झाले आहेत.
पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून परळीच्या श्री प्रभु वैद्यनाथ ज्योतिर्लिंग ओळखले जाते.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने पूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली आहे.
मंदिर परिसराला पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणार आहे.
मंदिर परिसरात देवस्थानच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले आहेत.
या सीसीटीव्हीच्या मदतीने मंदिर परिसरात नजर ठेवण्यात येणार आहे.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काळजी देखील घेण्यात येत आहे.
तसेच पोलीस प्रशासन देखील यानिमित्ताने सतर्क झालं आहे.