जालन्यात मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे AI फोटो
मागील काही दिवसापासून राज्यातील वातावरण मराठा आरक्षणावरुन तापलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्याला कारण आहे जालन्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावात पोलिसांनी मराठा समजातील आंदोलकवर केलेला लाठीचार्ज.
या सर्वांमध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा आहे ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरु आहे.
याच उपोषणादरम्यान हा सगळा प्रकार घडला आणि मराठा आरक्षण सोबत मनोज जरांगे चर्चेत आले.
याच मनोज जरांगे यांचे AI द्वारे फोटो तयार केलेत बार्शीतील कलाकार सचिन नलावडे यांनी.
दरम्यान, उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची डॉक्टरांनी आज तपासणी केली.
त्यातच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण आणखी तीव्र करत आजपासून पाणीही घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे गेल्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत.
जालन्यातील घटनेनंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे.