Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shravan Somvar : तिसरा श्रावण सोमवार, सिंधुदुर्गच्या कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गच्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात श्रावण सोमवारी दर्शनासाठी शिवभक्तांची गर्दी झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाविकांबरोबरच परजिल्ह्यातूनही शिवभक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी कुणकेश्वर मंदिरात दाखल झाले आहेत.
भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे.
ड्रेसकोड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे.
भारतीय संस्कृती, परंपरांचे रक्षण, संवर्धन आणि जतन करण्याबरोबरच मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.
तोकडी, अंगप्रदर्शक तसेच उत्तेजक वस्त्रे, फाटलेल्या जीन्स परिधान केलेल्या भाविकांना थेटपणे मंदिर प्रवेश करता येणार नाही.
अशा भाविकांना देवस्थानकडून शाल, उपरणे, पंचा, ओढणी आदी वस्त्रे मोफत देण्यात येत आहेत.
यासाठी भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आज तिसरा श्रावण सोमवार निमित्त कुणकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी केली आहे.
नेहमी या मंदिरात भाविक येत असतात याचं पार्श्वभूमीवर वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.