Dasara Melava : आता मी थांबणार नाही; पंकजा मुंडे कडाडल्या! वाचा महत्त्वाचे मुद्दे!
भाजपच्या राजकीय पटलावरावरून काहीशा दूर असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) दसरा मेळाव्याला संबोधित करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवशक्ती परिक्रमेला जनतेने मला चांगला प्रतिसाद दिला, अतोनात प्रेम दिलं आणि अशा या जनतेला, गोरगरिबांना न्याय मिळवून देणारच, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी केली आहे. सावरगावमध्ये पंकजा मुंडेंच्या सभेसाठी अवघा जनसागर लोटला आहे.
माझ्या कारखान्यावर छापे पडले तेव्हा तुम्ही कोट्यवधी जमा केले. दोन दिवसांत तुम्ही 11 कोटींचा चेक जमा केला, असं पंकजा मुंडे जमलेल्या जनसमुदायाला म्हणाल्या आणि जनतेचे आभार मानले.
मी लोकांचे पैसे नाही, आशीर्वाद मात्र नक्की घेणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या लोकांना माझ्यामुळे फक्त त्रास होत असल्याचं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडेची निष्ठा इतकी लेचीपेची नाही, माझ्याकडे पद नसतानाही माझी जनता माझ्यासोबत असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मला माहीत नाही मी तुम्हाला काय देऊ शकेल, पण मी तुम्हाला स्वाभिमान मात्र नक्कीच देऊ शकते, असं पंकजा मुंडे जनतेला म्हणाल्या.
ज्यांना पदं दिलं आहेत, ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. परंतु माझी जनता कधीही माझ्यापासून दूर जाऊ शकत नाही, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.
भगवान भक्तिगड ट्रस्टच्या वतीने पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला. सभेआधी साडी-चोळी आणि पुष्पाहार देऊन पंकजा मुंडेंचा सत्कार करण्यात आला.
ऊसतोड कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे, सरकारकडून लोकांना अपेक्षा असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी फक्त वंचितांसाठी काम केलं, कधी जात-धर्म पाहिला नाही, गोरगरिबांसाठी काम केलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मला इतकं प्रेम मिळेल असं मला वाटलं नव्हतं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. मी सर्व कार्यकर्त्यांचे उपकार कधी फेडू शकत नाही, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं.