मराठा आरक्षणासाठी बीडच्या पाटोदा तालुक्यातील डोंगरकिनी गावात पाच युवकांचे अन्नत्याग आंदोलन
गोविंद शेळके, एबीपी माझा
Updated at:
05 Sep 2023 09:25 AM (IST)
1
तीन दिवसांपासून त्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या आंदोलनात ग्रामस्थही सहभागी होत आहेत.
3
जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू आहे.
4
जालन्यात झालेल्या लाठीमारावरून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.
5
अशातच बीड जिल्ह्यातील युवकांनीही आंदोलन सुरू केल्यामुळे आता मराठा आरक्षण आंदोलनाला आणखी धार आलीय.
6
जिल्हा प्रशासनाने त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली
7
परंतु मराठा आरक्षणासंदर्भात ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचं या युवकांनी स्पष्ट केलंय.
8
जालन्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आंदोलकांवर लाठीमार झाल्यानंतर, राज्यभरात आंदोलनांचा वणवा पेटलाय.
9
या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा बांधव आंदोलन करणार आहेत.