Health Tips : उचकी थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा
जेव्हा कधी आपल्याला उचकी (Hiccups) येते तेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आपली आठवण काढतंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण हीच जर उचकी जास्त किंवा वारंवार येत राहिली तर खूप चिडचिड होते. खरंतर, उचकी येणं हे अगदी सामान्य लक्षण आहे.
ण जर तुम्हाला वारंवार उचकी येत असेल तर मात्र, काळजी करण्याचं कारण आहे. उचकी येण्याची नेमकी कारणं कोणती आणि ते थांबवण्याचे उपाय नेमके कोणते आहेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
असे म्हणतात की, घशाच्या नालिकेमधून उचकी येते. उचकी ही तुमच्या स्नायूंची अनैच्छिक क्रिया आहे.
जेव्हा डायाफ्रामचे स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि आपण त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, तेव्हा उचकी लागते. पण, काही काळानंतर या उचक्या थांबतात.
उचकी थांबवण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्या, त्यात काही पुदिन्याची पाने, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ घाला. हे पाणी प्यायल्याने गॅसपासून आराम मिळेल आणि उचकी देखील दूर होतील.
एक चतुर्थांश हिंग पावडर घेऊन त्यात अर्धा चमचा बटर मिसळून खावे. हे खाल्ल्याने हिचकी थांबते
सुंठ आणि मायरोबलन पावडर एकत्र करून एक चमचा पावडर पाण्याबरोबर घेतलयास आराम मिळेल.
वेलचीचे पाणी देखील उचकी थांबवण्यासाठी खूप प्रभावी आहे. यासाठी 2 वेलची पाण्यात उकळा आणि ते पाणी प्या