Spicy Food Disadvantages : मसालेदार पदार्थ खात आहात? आधी त्यामुळे होणारे नुकसान जाणून घ्या !
अनेकदा लोक बाहेरचे खाणे पसंत करतात. चायनीज असो की दक्षिण भारतीय लोकांना फक्त मसालेदार आवडतात. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाहीवेळा मसालेदार अन्न ठीक आहे, परंतु असे अन्न दररोज सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.[Photo Credit : Pexel.com]
तेलाचा वापर धोकादायक आहे : अनेकदा स्त्रिया स्वयंपाक करताना तेलाचे प्रमाण वाढवतात, त्यामुळे जेवणाला चव येते, पण असे करणे खूप धोकादायक ठरू शकते. तेलामध्ये जास्त प्रमाणात लिपिड असतात, जे आपल्या शरीरासाठी हानिकारक असू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. याशिवाय लोकांमध्ये पचनसंस्थेच्या समस्याही दिसून आल्या आहेत. [Photo Credit : Pexel.com]
जास्त प्रमाणात तेलाचे सेवन केल्याने पोटात जळजळ, ॲसिडिटी, गॅस, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कमी वयात अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात. जास्त तेल आणि मसाले खाल्ल्याने मधुमेह आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो.[Photo Credit : Pexel.com]
जास्त तेल आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती आजारी पडते. त्यामुळे उलट्या, जुलाब, चक्कर येणे अशा समस्या उद्भवू लागतात. [Photo Credit : Pexel.com]
यावर उपाय म्हणून आजपासूनच जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे बंद करा. त्या बदल्यात संतुलित आहार घ्यावा. [Photo Credit : Pexel.com]
बाहेरचे खाण्याऐवजी घरी बनवलेले साधे अन्न खा. याशिवाय हेल्दी तेल वापरा आणि मसाले कमी वापरा.[Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]