Toyota Rumion launched: टोयोटा रुमियन एमपीव्ही भारतात लाँच; पाहा किंमत, फोटो आणि वैशिष्ट्यं

Toyota Rumion: टोयोटाने भारतात आपली सर्वात स्वस्त 7 सीटर कार Rumion लाँच केली आहे. तिची किंमत आणि वैशिष्ट्यं फोटोंमधून जाणून घेऊया.

Toyota Rumion launched

1/11
टोयोटा मोटर्सने सर्वात परवडणारी आपली 7 सीटर MPV कार टोयोटा रुमियन (Toyota Rumion) लाँच केली आहे, ज्याची किंमत 10.29 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप एंड व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 13.68 लाख रुपये आहे.
2/11
मारुती सुझुकीच्या परवडणाऱ्या अर्टिगा कारपेक्षा Rumion ची किंमत 1.65 लाख रुपयांनी जास्त आहे. पण अर्थातच, टोयोटाच्या कारमधील फिचर्स उत्कृष्ट आहेत. पेट्रोल आणि सीएनजी पर्यायामध्ये लाँच केलेल्या टोयोटा रूमियनची किंमत विविध रेंजमध्ये पाहायला मिळते.
3/11
दिग्गज कार कंपनी टोयोटाने रुमियनमध्ये काही स्पेशल फिचर्स दिले आहेत. 8 सप्टेंबरपासून टोयोटो रुमियनची डिलिव्हरी सुरू होईल, असं कंपनीने म्हटलं.
4/11
किंमत आणि विविध रेंजबद्दल बोलायचं झालं तर- एस एमटी (पेट्रोल) व्हेरियंटची किंमत 10,29,000 रुपये आहे. एस एटी (पेट्रोल) व्हेरिएंटची किंमत 11,89,000 रुपये आहे. जी एमटी (पेट्रोल) व्हेरिएंटची किंमत 11,45,000 रुपये आहे. व्ही एमटी (पेट्रोल) व्हेरियंटची किंमत 12,18,000 रुपये आहे. व्ही एटी (पेट्रोल) व्हेरियंटची किंमत 13,68,000 रुपये आहे. तर एस एमटी (CNG) व्हेरिएंटची किंमत 11,24,000 रुपये इतकी आहे.
5/11
रुमियन 7-सीटर MPV ला 1.5-लिटर K-सिरीज पेट्रोल इंजिन मिळतं, जे 102bhp पॉवर आणि 137Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे, तसेच CNG पर्यायामध्ये ते 87bhp पॉवर आणि 122Nm टॉर्क निर्माण करते.
6/11
गिअरबॉक्स पर्यायांमध्ये मॅन्युअल आणि टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक समाविष्ट आहेत.
7/11
इंटेरियरबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन टोयोटा रुमियनमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह 7-इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते.
8/11
याशिवाय टोयोटा आय-कनेक्ट, कनेक्टेड कार तंत्रज्ञान आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी ही कार सुसज्ज आहे. तसेच, टोयोटा रुमियनमध्ये वुड इन्सर्टसह ड्युअल-टोन इंटेरियर्स उपलब्ध आहेत.
9/11
सुरक्षेच्या दृष्टीने बोलायचं झाल्यास, Toyota Rumion ला ड्युअल फ्रंट आणि साइड एअरबॅग्ज आहेत. त्याच बरोबर या कारमध्ये EBD सह ABS, इंजिन इमोबिलायझर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP) आणि बरंच काही मिळतं.
10/11
टोयोटाची रुमियन कार मारुती सुझुकी एर्टिगा आणि XL6 तसेच किआ केरेन्स आणि सेगमेंटमधील इतर कारशी स्पर्धा करेल.
11/11
टोयोटा रुमियन ही एक कमी खर्चातील आणि दर्जेदार फिचर्सची उत्तम फॅमिली कार आहे.
Sponsored Links by Taboola