Kriti Senon: 'माझी सुंदरी...'; राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर सईनं कृतीसाठी शेअर केली खास पोस्ट
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Awards) घोषणा झाली आहे. अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृतीला मिमी या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. मिमी या चित्रपटात कृतीसोबत सई ताम्हणकरनं देखील काम केलं होतं.
सईनं कृतीसाठी खास पोस्ट शेअर केली.या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'माझी सुंदरी, एवढ्या मोठ्या सन्मानाबद्दल आणि यशाबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन.'
आम्हाला सर्वांना तुझा अभिमान आहे, असंही सईनं पोस्टमध्ये लिहिलं.
'पंकज त्रिपाठी सर, आम्हाला तुमची खूप आठवण आलीय आम्ही तुमच्याकडून नेहमीच खूप काही शिकलो आहोत आणि शिकत राहणार आहोत.' असंही सईनं पोस्टमध्ये लिहिलं
सई ही राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर कृतीला भेटायला गेली होती.
पंकज त्रिपाठी यांना मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या श्रेणीतील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार घोषित झाला आहे.
मिमी हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.