Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Toyota Innova HyCross: टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ठरली 'एमपीव्ही ऑफ द इयर', जबरदस्त फीचर्ससह येते ही कार
सेल्फ-चार्जिंग स्ट्राँग हायब्रीड इलेक्ट्रिक आणि गॅसोलीन व्हेरियंटसह ऑल न्यू इनोव्हा हायक्रॉस एक जबरदस्त कार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया पुरस्कार जिंकल्यानंतर टोयोटा किर्लोस्कर मोटरचे सेल्स अँड स्ट्रॅटेजिक मार्केटिंगचे उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, ऑल न्यू इनोव्हा हायक्रॉससाठी 'एमपीव्ही ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही सन्मानित आणि आनंदी आहोत.
इंजिन : नवीन टोयोटा इनोव्हा हायक्रॉस 2 पेट्रोल व्हेरिएंट आणि 3 हायब्रिड व्हेरिएंटमध्ये विकली जाईल. नवीन इनोव्हा हायक्रॉस TNGA 2.0L ला 5व्या जनरेशन सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक सिस्टीम मिळते. ज्यामध्ये 4 सिलेंडर गॅसोलीन इंजिन आणि ई-ड्राइव्ह अनुक्रमिक शिफ्टसह मोनोकोक फ्रेम 137 kW (186 PS) चे पॉवर आउटपुट जनरेट करते.
ही कार सेगमेंट मायलेजमध्ये सर्वोत्तम. ही कार 128 kW (174 PS) उत्पादन करणाऱ्या निवडक ग्रेडमध्ये डायरेक्ट शिफ्ट CVT शी जोडलेले TNGA 2.0L 4-सिलेंडर गॅसोलीन इंजिनसह येते.
फीचर्स : नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये हवेशीर फ्रंट सीट भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची काळजी घेते. यात JBL प्रीमियम 9 स्पीकर सिस्टमसह 25.65 सेमी (10.1-इंच) कनेक्ट केलेला डिस्प्ले ऑडिओ, दुसऱ्या रांगेसाठी सेगमेंट-फर्स्ट पॉवर्ड ऑटोमन सीट्स आणि मल्टी-झोन A/C सारखे फीचर्स यात मिळतात.
डिझाइन : नवीन इनोव्हा हायक्रॉस मजबूत असून याचा डिझाइन जबरदस्त आहे. ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेईल, यात काहीच शंका नाही. याची बोनेट लाइन, एक मोठी षटकोनी गनमेटल फिनिश ग्रिल, ऑटोमॅटिक एलईडी हेडलॅम्प्स, सुपर क्रोम अलॉय व्हील्स आणि एक मोठा बंपर याच्या मजबूत लूकमध्ये आणखी भर घालतात.
या आहेत भारतातील टॉप एमपीव्ही : Maruti Ertiga , Renault Triber , Maruti XL6 , Toyota Vellfire आणि Mahindra Marazzo या देशातील टॉप एमपीव्ही कार्स आहेत.