Top upcoming SUVs: भारतात लवकरच लॉन्च होणार 'या' टॉप 7 SUV, मिळणार जबरदस्त फीचर्स
Top upcoming SUVs: देशात एसयूव्ही कारची खूप क्रेझ आहे. तुम्हीही नवीन एसयूव्ही घेण्याच्या मूडमध्ये असाल, तर काही काळ प्रतीक्षा करा. आम्ही तुम्हाला देशातील टॉप आगामी SUV बद्दल सांगणार आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमारुती जिम्नी 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. ही 5-डोअर SUV असेल. जिम्नी 5-डोरला पॅडल शिफ्टर्ससह नवीन 1.5 L पेट्रोल इंजिन आणि अधिक प्रगत 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळेल.
एमजी हेक्टर एक प्रमुख फेसलिफ्ट असेल. याची लॉन्चिंग पुढील वर्षाच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. आगामी नवीन हेक्टरला एक मोठे नवीन लोखंडी ग्रील आणि स्टाइलिंग ट्वीक्स तसेच एक मोठे आणि नवीन इंटीरियर मिळेल. यात 14-इंच टचस्क्रीन मिळेल.
लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज एक नाही तर दोन नवीन SUV, GLB आणि EQB सादर करणार आहे. EQB ही इलेक्ट्रिक व्हर्जन असेल. GLB पेट्रोल आणि डिझेलसह दोन इंजिनांसह येईल. तर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये 400 किमी पेक्षा जास्त रेंज मिळवू शकते. EQB च्या स्टाइलमध्ये थोडा फरक असला तरी दोन्ही SUV समान असतील.
Hyundai Ioniq5 लवकरच भारतात येत आहे. ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक SUV असेल. लॉन्च झाल्यानंतरच याची किंमत जाहीर केली जाईल.
Ioniq5 सिंगल मोटर स्वरूपात विकली जाईल. रेंजबद्दल बोलायचे तर ही कार 500 किमी पेक्षा जास्त रेंज देऊ शकते.
जीपची फ्लॅगशिप लक्झरी एसयूव्हीही लवकरच लॉन्च होणार आहे. कंपनी ही टर्बो पेट्रोल पॉवरट्रेनसह विकणार आहे. ADAS सह या आगामी SUV मध्ये अनेक सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतील. ही एक ऑफ-रोडिंग एसयूव्ही आहे.
कार उत्पादक BMW लवकरच आपली X7 लक्झरी SUV देखील नवीन अवतारात सादर करणार आहे.
आगामी SUV नवीन तंत्रज्ञान तसेच अतिरिक्त फीचर्ससह भारतीय बाजारपेठेत पदार्पण करेल.
टोयोटा लवकरच आपला नवीन इनोव्हा हाय क्रॉस देशात लॉन्च करणार आहे. स्टाइलिंगच्या बाबतीत ही एसयूव्ही जबरदस्त असेल. या कारचे इंटीरियर प्रेक्षणीय असणार आहे. पॅनोरामिक सनरूफ आणि बरेच काही यात मिळणार आहे. दुसरा मोठा बदल म्हणजे टोयोटा ही कार हायब्रीड प्रकारात आणणार आहे.