In Pics : एकाच छताखाली स्कूटीपासून ते स्पोर्ट्स बाईक्स, यामाहाच्या अत्याधुनिक शोरुम्सची संख्या 100 वर!
प्रसिद्ध बाईक कंपनी यामाहा अगदी आधीपासून आपल्या वेगवान आणि स्पोर्टी लूक असणाऱ्या बाईक्ससाठी प्रसिद्ध आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppR15 बाईकने तर कित्येक वर्ष भारतीय बाजारपेठ गाजवली असून आता यामाहाच्या बाईक्ससह स्कूटी देखील तयार करत आहे.
विशेष म्हणजे आता एकाच छताखाली यामाहा कंपनीच्या विविध बाईक्स, स्कूटी तसंच सर्वच दुचाकी रिलेटेड गोष्टी खरेदी करता येणार आहेत.
यामाहाने ‘ब्लू स्क्वेअर’ असे आधुनिक प्रकारचे शोरुम आता देशभरात सुरु केले आहेत.
नुकतीच देशभरातील या शोरुम्सची संख्या 100 वर पोहोचली आहे.
या ठिकाणी यामाहा कंपनीच्या स्कूटर्सपासून ते लेटेस्ट स्पोर्ट्स बाईक्सपर्यंत सर्व काही आहे.
तसंच कोणती बाईक तुमच्यासाठी योग्य आहे हे समजावून सांगण्यासाठी सक्षम असा स्टाफही या शोरुममध्ये कार्यरत आहे.
यामुळे ग्राहकांना फक्त बुकलेटमध्ये फोटो न पाहता प्रत्यक्षात बाईक पाहता येणार आहे, ज्यामुळे अगदी आधुनिक अनुभव ग्राहकांना मिळेल.
बाईक्ससह याठिकाणी बाईक्ससंबधी इतरही गोष्टी जसंकी बाईक ऑईल, रायडर्स जॅकेट अशा विविध गोष्टीही ग्राहकांना विकत घेता येतील.
मुंबईतही ठाणे, उल्हासनगर आणि साकिनाका अशा विविध ठिकाणी हे ‘ब्लू स्क्वेअर’ शोरुम आहेत.