जबरदस्त लूक, पॉवरफुल इंजिन; जाणून घ्या कशी आहे नवीन Royal Enfield Classic 500
प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी Royal Enfield च्या बाईक भारतात खूप पसंत केल्या जातात. कंपनीच्या बाईकला देशात खूप मागणी देखील आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअलीकडेच कंपनीने Classic Collectible लॉन्च केली आहे. जी Royal Enfield Classic 500 चा लहान मॉडेल आहे.
कंपनीच्या वतीने पहिल्यांदा ही बाईक Rider Mania 2022 मध्ये आठ वेगवेगळ्या रंगात सादर करण्यात आली होती.
Collectible ला बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, Royal Enfield Classic 500 Collectible सोल्ड आऊट झाली आहे.
Royal Enfield Classic 500 Collectible True-Blue खास रॉयल एनफिल्ड रायडरसाठी तयार करण्यात अली आहे.
मिनिएचरमध्ये मूव्हिंग थ्रॉटल, मूव्हिंग क्लच युनिट, अॅडजस्टेबल सस्पेंशन, अॅडजस्टेबल चेन ठेवण्यासाठी मायक्रो की असे मूव्हिंग पार्टस देण्यात आले आहेत. या बाईकचे वजन सुमारे 8.5 किलो आहे.
याची लांबी 2.5 फूट, रुंदी 1.25 फूट आणि उंची 0.85 फूट आहे. याची किंमत अंदाजित 67,990 रुपये आहे.
कंपनीने आपल्या या नवीन बाईकमध्ये UCE 500cc BS IV इंजिन दिले आहे.
क्लासिक 500 ट्रिब्युट ब्लॅक बीएस IV ही फॅक्टरीमध्ये प्रीमियम लेदर टूरिंग सीट्सच्या जोडीने सुसज्ज असेल.