Credit Card Debt:क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळे कर्जाच्या जाळ्यात अडकलात? बिल पेमेंटसाठी फॉलो करा 'या' टिप्स
क्रेडिट कार्डच्या अतिवापराने तुम्ही कर्जाच्या जाळ्यात अडकू शकता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appक्रेडिट कार्डचे पेमेंट जर तुम्ही दिलेल्या मुदतीत न भरल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
त्याशिवाय क्रेडिट कार्डधारकाच्या क्रेडिट स्कोअरवर देखील परिणाम होतो.
क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास पुढील काळात कर्ज घेण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणे आवश्यक आहे.
बहुतांशी क्रेडिट कार्ड कंपन्या जवळपास 40 टक्क्यांपर्यंत दंड आकारतात.
काही टिप्स फॉलो केल्यास, नियोजन केल्यास तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यातून बाहेर येऊ शकता.
क्रेडिट कार्डचे बिल आधी तुम्ही EMI मध्ये बदलून घ्या.
EMI द्वारे तुम्ही क्रेडिट कार्ड बिल पेमेंट तुम्ही टप्प्याटप्प्याने करू शकता.
क्रेडिट कार्डवर तुम्हाला अधिक दंड लागत असेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड बिल इतर बँकेत, फायनान्स कंपनीत ट्रान्सफर करू शकता.
त्याशिवाय, तुम्ही बँकेकडून पसर्नल लोन घेऊ शकता. पसर्नल लोनचे व्याज दर 11 टक्क्यांपर्यंत असते. क्रेडिट कार्डवर 40 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जातो. त्यातुलनेत 11 टक्के कमी आहे.